Advertisement

maharashtra assembly election: गोची! काँग्रेसच्या प्रचारास उर्मिलाचा ठाम नकार!!

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अभिनेत्री आणि माजी काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा प्रचार करण्यास ठाम नकार दिला आहे.

maharashtra assembly election: गोची! काँग्रेसच्या प्रचारास उर्मिलाचा ठाम नकार!!
SHARES
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अभिनेत्री आणि माजी काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा प्रचार करण्यास ठाम नकार दिला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

मनधरणी फेल

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्वतः उर्मिला मातोंडकर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी उर्मिला मातोंडकर यांना विधानसभा प्रचारासाठी येण्यासाठी मनधरणी केली होती. परंतु त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचारसाठी मैदानात उतरण्यास साफ मनाई केल्याचं समजत आहे.

कंटाळून राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींविरोधात निवडणूक लढवली. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासून त्या नाराजच होत्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळालं नाही, असा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला होता. त्यांनी तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना लिहिलेलं पत्र सर्वांसमोर आल्याने या नाराजीत आणखीनच भर पडली होती. त्यानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं म्हणत राजीनामा दिला होता.



हेही वाचा-

उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर? कारण काय?

उर्मिला राजीनामा मागे घेणार? वरिष्ठांकडून संयम बाळगण्याचा सल्ला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा