Advertisement

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका!

सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोणताही दिलासा देण्यात आला नाही.

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका!
SHARES

सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. तसंच याप्रकरणी त्यांना रितसर अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए कोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले आहे.

ईडीनं अद्याप आपल्याला याप्रकरणी दाखल ईसीआयआरची कॉपी दिलेली नाही. ती देण्यास आम्ही बांधिल नाही अशी ठाम भूमिका तपास यंत्रणेच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात घेतली. तसंच अडसूळ हे केवळ नाटक करत असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा ईडीच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला.

लोकप्रतिनिधी राहिलेले अडसूळ जर तपासकामात अडथळा आणत असतील तर तपास कसा करणार? असा सवालही यावेळी एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित करत अडसुळांच्या याचिकेला जोरदरा विरोध केला. तर ईडीनं केवळ राजकीय दबावातून ही कारवाई सुरू केल्याचा आरोप अडसुळांनी केला आहे.

तसंच याप्रकरणात आपणच मूळ तक्रारदार होतो. तेव्हा आपल्यालाच आरोपी कसं बनवण्यात येईल? असा सवाल अडसुळांच्या वतीनं अॅड.अभिनव चंद्रचूड यांनी उपस्थित केला.

मात्र, अशी अनेक प्रकरणी असतात ज्यात तक्रादारच पुढे आरोपी झालाय असं मत व्यक्त करत न्यायमूर्ती नितीन जमदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी अडसूळांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को.ऑ. बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली.



हेही वाचा

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज

मनसेच्या बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा