Advertisement

नारायण राणे, बाळा नांदगावकरांना न्यायालयाचा दिलासा, अॅट्राॅसिटीचा गुन्हा रद्द


नारायण राणे, बाळा नांदगावकरांना न्यायालयाचा दिलासा, अॅट्राॅसिटीचा गुन्हा रद्द
SHARES

खासदार नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि राणेंचे निकटवर्तीय रवी शेंडगे यांच्यावरील अॅट्राॅसिटीचा गुन्हा रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.


कुठल्या प्रकरणात दिलासा?

२००२ मध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी युतीनं जोर लावत अविश्वास ठराव आणला होता. दरम्यान या अविश्वास ठराव मंजूर करून घेण्यासाठी राणे, नांदगावकर आणि शेंडगे यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचं अपहरण केल्याचा आरोप झाला.


तिघेही शिवसेनेत

वळवींचं अपहरण करत त्यांना ५ जून ते १२ जून २००२ पर्यंत मातोश्री स्पोर्टस क्लबमध्ये डांबून ठेवण्यात आलं. तर राज्यापालांच्या नावे युतीला पाठिंबा असल्याचं पत्र जबरदस्तीनं लिहून घेतल्याचाही आरोप होता. त्यानुसार या तिघांविरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी हे तिघेही शिवसेनेत होते.


खंडपीठाचा दिलासा

त्यानुसार या तिघांनी अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यातून दिलासा मिळावा अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. मात्र ही मागणी सत्र न्यायालयानं फेटाळून लावली. त्यानंतर तिघांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सोमवारी न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने या तिघांवरील गुन्हा रद्द करत त्यांना दिलासा दिला.



हेही वाचा-

अजित पवारांवरील टीकेवर रोहित पवारांनी दिलं असं सडेतोड उत्तर

बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव आहेत, अजित पवारांचा पलटवार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा