सिमीप्रमाणे सनातनवर बंदी घाला - अबू आझमी

  Churchgate
  सिमीप्रमाणे सनातनवर बंदी घाला - अबू आझमी
  मुंबई  -  

  जाती आणि धर्मांध कारवाया करणाऱ्या सिमी संघटनेच्या धर्तीवर  सनातन संस्थेवरही सरकारने तात्काळ बंदी घालावी,  अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी  मनसेविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले मनसेकडून  सतत परप्रांतियांना टार्गेट केले जात आहे. उत्तरप्रदेश बिहार, झारखंड, आजमगड येथून  मुंबईत नोकरी-धंद्यासाठी येणाऱ्या गोरगरिबांना नाहक मारहाण केली जाते. अबू आझमींनी याचा निषध व्यक्त केला आहे. तसेच कॉमिडियन  कपिल शर्माने पालिकेवर जे भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. ते सत्य आहेत.कारण प्रत्येक कामासाठी पालिका कर्मचारी  आणि अधिकारी हे पैशाची मागणी करत असतात. मग ते.नारायण राणेंसारखे राजकीय नेते असले तरी त्यांनाही हे लोक सोडत नाहीत. असेही आझमी म्हणाले. तर सन 2001मध्ये तत्कालीन सरकारने सिमी संघटनेवर जशी बंदी घातली तशीच बंदी सनातन संस्थेवर घालावी, असे अबू आझमी यांनी सांगितले.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.