बुलेट ट्रेन म्हणजे पांढरा हत्ती, छगन भुजबळ यांची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला ​बुलेट ट्रेन प्रकल्प​​​ महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली.

SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचं मतही बुलेट ट्रेनच्या बाजूने नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- मागच्या मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ प्रकल्पही गोत्यात?

फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेल्या प्रकल्पांचा सध्या नव्या सरकारकडून आढावा घेण्यात येत आहे. यातील कुठल्या प्रकल्पांवर किती खर्च झाला आहे? कुठल्या प्रकल्पाची प्रगती काय? कुठले प्रकल्प जनतेसाठी आवश्यक आहेत? त्यानुसार या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे. 

सध्या महाराष्ट्रावर ४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. शिवाय इतर प्रकल्पांचं २ लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. असं असताना बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प उशीरा हाती घेता येतील का? यावर विचार केला जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

तर बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती असल्याचं माझं वैयक्तिक मत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.     

संबंधित विषय
ताज्या बातम्या