Advertisement

अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी, महाविकास आघाडीकडून निषेध

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी, महाविकास आघाडीकडून निषेध
SHARES

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळतेय. चतुर्वेदी यांची सीबीआयनं चौकशी करून त्यांची सुटका केली आहे. देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं.

अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण १० ते १२ जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केलाय. सीबीआयच्या या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीन चिट दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, देशमुख प्रकरणात अद्याप चौकशी सुरु असल्याचं सीबीआयकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान, सीबीआयचा एक अहवालही त्यावेळी समोर आला होता. या अहवाल प्रकरणात सीबीआयने चतुर्वेदी यांना आणि देशमुखांच्या वकिलांना ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, जवळपास अर्धा तास चौकशी करुन चतुर्वेदी यांना सीबीआयनं सोडून दिल्याचंही कळतंय.

केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. “देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे ” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी सीबीआयच्या कारवाईवर टीका केलीय.

अनिल देशमुख यांना ईडीनं आतापर्यंत ५ समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.

तिसरं समन्स बजावल्यानंतर ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स ३० जुलै रोजी पाठवून २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर १८ ऑगस्ट हे पाचवं समन्स होत. १६ ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना १८ ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत.हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा