Advertisement

एकच शिवजयंती झाली पाहिजे, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

यंदाच्या वर्षी तिथी की तारीख असा वाद न करता एकच शिवजयंती (Shiv jayanti) साजरी झाली पाहिजे, असं म्हणत भाजप नेते आमदार नितेश राणे (bjp mla nitesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना टोला हाणला आहे.

एकच शिवजयंती झाली पाहिजे, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
SHARES

यंदाच्या वर्षी तिथी की तारीख असा वाद न करता एकच शिवजयंती (Shiv jayanti) साजरी झाली पाहिजे, असं म्हणत भाजप नेते आमदार नितेश राणे (bjp mla nitesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना टोला हाणला आहे.

राज्य सरकारच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती (shivaji maharaj birth anniversary) दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच तारखेनुसार साजरी करण्यात येते. तर शिवसेना मात्र शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करते. परंतु यंदा शिवाजी महाराजांची जयंती तिथी ऐवजी १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (ncp leader amol mitkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. त्यासाठी त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकत उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.

हेही वाचा- तिथीचा हट्ट सोडा, शिवजयंतीसाठी मुख्यमंत्र्यांना कुणी केलं आवाहन?

शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी कालगनणेप्रमाणे नाही, तर मराठी तिथीप्रमाणेच शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई (shiv sena mla shubhash desai) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली होती. 

शिवजयंती साजरी करण्यावरून २०१८ साली शिवसेना आणि अन्य मराठा संघटनांमध्ये औरंगाबादमध्ये हाणमारी देखील झाली होती. शिवसेना नेते शिवजयंतीचा (shiv jayanti) घोळ घालून शिवरायांचा अवमान करत आहेत. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणं बंद करावं, अशी मागणी नितेश राणेंनी (nitesh rane) केली होती.

त्यातच आता अमोल मिटकरींनी (amol mitkari) मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने मुख्यमंत्री या आवाहनाची कितपत दखल घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मिटकरी हे राष्ट्रवादीचे नेते असून राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे. हाच धागा पकडून नितेश राणे (nitesh rane) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे.

हेही वाचा- येतो का पक्षात? जेव्हा राज ठाकरे स्वत:च देतात आॅफर

महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे एकच शिवजयंती (shiv jayanti) साजरी झाली पाहिजे. दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाका. एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्या सोबत आहे, हीच ती वेळ असं म्हणत नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला उकसवण्याचा प्रयत्न केला आहे.   

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा