Advertisement

केंद्राने लस पुरवठ्यात हात आखडता घेऊ नये- राजेश टोपे

येत्या १ मे पासून महाराष्ट्रासह देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर लशींची गरज लागणार आहे.

केंद्राने लस पुरवठ्यात हात आखडता घेऊ नये- राजेश टोपे
SHARES

येत्या १ मे पासून महाराष्ट्रासह देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर लशींची गरज लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लशींच्या पुरवठ्यात हात आखडता घेऊ नये, अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 

जालना शहरात उभारण्यात आलेल्या ११० खाटांच्या कोरोना उपचार केंद्राच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले की, १८ ते ४४ वर्षांदरम्यानच्या नागरिकांच्या लसीकरणाची सर्वस्वी जबाबदारी ही राज्यांवर टाकण्यात आलेली आहे. तर ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी केंद्राकडून लस पुरवठा चालूच राहणार आहे. सध्याची परिस्थिती बघितल्यास लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक कोरोना केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहे. 

हेही वाचा- मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर

त्यात १८ वर्षांवर्षांवरील नागरिकांचाही लवकरच भार पडणार आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करायचं झाल्यास राज्याला दररोज ८ लाख लशींची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी (maharashtra) कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा करताना हात आखडता घेणं योग्य नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. सोबतच ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे देखील स्पष्ट केलं आहे. त्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु लशींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणाला वेग नेमका कसा द्यायचा असा प्रश्नही सर्वांना पडलेला आहे. 

यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत झालेल्या चर्चेत सर्वांना मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झालं होतं. लस मिळवण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचंही ठरवण्यात आलेलं आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री १ मे रोजी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

(central government must provide more covid 19 vaccine to maharashtra says rajesh tope)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा