केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लस वाटप करताना राज्याला अंधारात ठेवून खाजगी लोकांना व खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत केली. यामुळेच बोगस लसीकरण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
यासंदर्भात वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, राज्यात विशेषतः मुंबईत लसीकरणाचा बोगसपणा झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे. मात्र या लसीकरणाचा बोगसपणा होण्याचं मुख्य कारण हे आहे की लसीचं वाटप करताना केंद्राने राज्याला माहिती न देताच खाजगी लोकांना व खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत केली.
त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही. सुरुवातीपासून जर खाजगी लोकांना लस देत असताना राज्यांना माहिती दिली असती तर, नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक यंत्रणा आहेत त्या यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या आणि अशा प्रकारचा बोगसपणा झाला नसता, असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा- नागरिकांवरील बोगस लसीचे दुष्परिणाम शोधा, न्यायालयाचा आदेश
राज्यात विशेषतः मुंबईत लसीकरणाचा बोगसपणा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे मात्र केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्याने ही घटना घडली. लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खाजगी लोकांना व खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. (१/३)#vaccination pic.twitter.com/TPgzYyqiQ4
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2021
मुंबईत (mumbai) बोगस लसीकरण करणाऱ्या रॅकेटचा नुकसाच पर्दाफाश करण्यात आला आहे. या शिबिरांमध्ये २०५३ लोकांना बोगस लस टोचण्यात आली आहे. बोगस लसीकरण करणाऱ्या रॅकेटने ९ ठिकाणी लसीकरण शिबिरं घेतली होती. याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेने २३ जून रोजी कांदिवली, बोरिवली, वर्सेवा, खार इथं गुन्हे दाखल केले. बोरिवलीत ज्या आदित्य महाविद्यालयात लसीकरण पार पडलं तेथील आशिष मिश्रा यांना आरोपी करण्यात आलं आहे. तर डॉ. मनीष त्रिपाठी हा आरोपी फरार असल्याची माहिती सरकारने दिली.
या प्रकरणी पाेलिसांनी आतापर्यंत ४०० साक्षीदारांचे जबाब नाेंदवले आहेत. कांदिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेत बनावट कॅम्प घेतल्याप्रकरणी एका डॉक्टरचा शोध सुरू आहे. काही आरोपींची ओळख पटली आहे.
लसीकरण स्लॉट उपलब्ध होत नसल्याबद्दल सिद्धार्थ चंद्रशेखर यांनी अॅड. अनिता कॅस्टिलिनो यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत घडलेल्या बोगस लसीकरणाची गंभीर दखल घेतली.
(central government responsible for bogus covid 19 vaccination in maharashtra allages nawab malik)
हेही वाचा- मुंबईनंतर ठाण्यातही बोगस लसीकरण, गुन्हा दाखल