Advertisement

चंद्रकांत पाटीलांनी एनआयएच्या कोठडीत जाऊन सचिन वाझेंचे भेट घेतली? स्वत:च केला खुलासा

चूक नसेल तर एवढा त्रागा कशासाठी? हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दोन मुलींच्या शपथा कशासाठी? स्वतःच म्हणताय ना की, चौकशीला सामोरं जाईन. मग जा ना... त्याचा गोंधळ कशासाठी

चंद्रकांत पाटीलांनी एनआयएच्या कोठडीत जाऊन सचिन वाझेंचे भेट घेतली? स्वत:च केला खुलासा
SHARES

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेंची भेट घेतली असावी, अशी शक्यता वर्तवणारे शिवसेनेचे मंत्री अनिल देशमुख यांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 

चूक नसेल तर एवढा त्रागा कशासाठी? हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दोन मुलींच्या शपथा कशासाठी? स्वतःच म्हणताय ना की, चौकशीला सामोरं जाईन. मग जा ना... त्याचा गोंधळ कशासाठी? फार तर परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भातील सीबीआय चौकशीत न्यायालय अनिल परबांचंही नाव जोडू शकेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब (anil parab) यांच्यावर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, महाराष्ट्रात १८ महिन्यांपूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून इथला सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे. कालच सचिन वाझेंनी एनआयएला एक पत्र लिहिलं. आता वाझे हे महावसुली आघाडीचे किती प्रिय? महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा विषय निघाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंच्या निलंबनाची मागली लावून धरली होती. नऊवेळा विधानसभा स्थगित करावी लागली, म्हणजे केवढं प्रेम होतं यांचं वाझेंवर. विधानसभेचा एक मिनिटही वाया जाणं म्हणजे कितीतरी लाख रुपयांचं नुकसान, पण या विषयावरून अख्खा दिवसभर सदन चाललं नाही, असं चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं. 

हेही वाचा- बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…, सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब म्हणाले..

दुसऱ्या दिवशी मात्र त्यावर गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परबांनी घोषणा केली. आता अनिल परबांचं म्हणणं आहे की एका मंत्र्यांचं नाव येणार आहे, हे तुम्हाला कसं कळलं, वगैरे वगैर… तर त्याची सुरूवात तिथं आहे. आता त्या वाझेंवर तुमचा अविश्वास इतका, की ते म्हणे एनआयएच्या कोठडीत मी त्याची भेट घेतली आणि त्यांना मी असं म्हटलं की परबांचं नाव घ्या. हे सगळं हास्यास्पद आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना टोला हाणला.

दरम्यान, अनिल परब यांनी बुधवारी सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्राद्वारे केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. माझं दैवत हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे कारस्थान आहे.

मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. एनआयए, सीबीआय, रॉ, नार्कोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे, असं अनिल परब म्हणाले होते.

(chandrakant patil comment on anil parab allegation over sachin vaze letter)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा