Advertisement

सरकारची असंवेदनशीलता! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्यक्त करावी लागली दिलगिरी

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार काॅ. माधवराव गायकवाड याचं १२ नोव्हेंबरला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. काॅ. गायकवाड पहिले विरोधी पक्ष नेते होते. त्यामुळे काॅ गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं गरजेचं होतं. पण त्यांच्या निधनानंतर ३० तास उलटूनही सरकारने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कच साधला नाही.

सरकारची असंवेदनशीलता! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्यक्त करावी लागली दिलगिरी
SHARES

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी विरोधी पक्षाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी काॅ. माधवराव गायकवाड यांच्या निधनावर राज्य सरकारकडून दाखवण्यात आलेल्या उदासीनतेबाबत राज्य सरकारनं माफी मागावी, अशी मागणी उचलून धरण्यात आली होती. त्यानुसार अधिवेशनाच्या सुरूवातीलाच राज्य सरकारच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रश्नी सरकारकडून दिलगिरी व्यक्त केली.


दिलगिरीचं कारण काय?

नाशिक, मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार काॅ. माधवराव गायकवाड याचं १२ नोव्हेंबरला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. काॅ. गायकवाड पहिले विरोधी पक्ष नेते होते. त्यामुळे काॅ गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं गरजेचं होतं. पण त्यांच्या निधनानंतर ३० तास उलटूनही सरकारने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कच साधला नाही. त्यामुळं काॅ माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. त्यातही ३० तासांनंतर संपर्क साधल्यानंतर २ तास थांबा असं उत्तर कुटुंबीयांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालं होतं.


सरकारची असंवेदनशीलता

सरकारच्या या असंवेदनशिलतेवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर हा मुद्दा अधिवेशनातही विरोधकांनी उचलून धरला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सरकारने दिलगिरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महसूलमंत्र्यांनी यावर दिलगिरी व्यक्त करत काॅ. गायकवाड यांच्या अंत्यसंस्काराबाबत नेमंक काय झालं याची माहिती घेत असून ही माहिती संध्याकाळपर्यंत येईल, असं सांगितलं.



हेही वाचा-

गोंधळात अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांचं पायऱ्यांवरच धरणं आंदोलन

समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नव्हताच- सुनील प्रभू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा