Advertisement

खरं बोललं की शिवसेनेला झोंबतं- चंद्रकांत पाटील

अमित शाह यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नव्हती, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला हाणला.

खरं बोललं की शिवसेनेला झोंबतं- चंद्रकांत पाटील
SHARES

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं त्यामुळे शिवसेनेला अजूनपर्यंत कुणीही संपवू शकलेलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली. मात्र अमित शाह यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नव्हती, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी शिवसेनेला टोला हाणला. 

अमित शाह यांच्या हस्ते रविवारी भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाषण करताना अमित शहा यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. शिवसेनेने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवून महाराष्ट्रात सत्ता मिळवली आहे. भाजप (bjp) तत्त्वांसाठी राजकारणात आलेला पक्ष आहे. आम्ही देखील तत्त्वांची मोडतोड करून तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अशा शब्दांत अमित शहा यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेला अजूनपर्यंत कुणीही संपवू शकलेलं नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. 

हेही वाचा- तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अमित शहांची टीका

याबाबत प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले, सरकार चालवताना आम्ही कधीही डूख धरून वागलो नाही. कारण सरकार हे जनतेची सेवा करण्यासाठी आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत (sanjay raut) यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसारच त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

त्यांच्या म्हणण्याला आम्ही घाबरत नाहीत. आम्हाला जे म्हणायचं ते छाती ठोकपणे म्हणतो. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागून बोलणं ही आमची, अमित शाह यांची संस्कृती नाही. मागच्या १४-१५ महिन्यापासून ज्या प्रकारे सरकार चालवण्यात येत आहे. तशा पद्धतीने जर आम्ही वागलो असतो, तर ५ वर्षांत शिवसेना (shiv sena) संपली असती, हे मात्र खरं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

(chandrakant patil slams shiv sena mp sanjay raut on amit shah comment)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा