Advertisement

काय बोललात..काय करून दाखवले?


काय बोललात..काय करून दाखवले?
SHARES

पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने सोमवारी वचननामा जाहीर केला. मात्र जी कामं आधीच सुरु आहेत किंवा ज्या योजनांची सद्य परिस्थिती फारशी समाधानकारक नाही अशा कामांचाही समावेश या वचननाम्यात करण्यात आला आहे.

वचननामा : नोकरदार पालकांसाठी त्यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणाघरे विभागा विभागांमधून सुरु करणार

स्थिती : मागील पाच वर्षांपासून याची केवळ चर्चाच सुरु असून, याची अंमलबजावणी करता आलेली नाही.


वचननामा : मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना

स्थिती: मागील निवडणुकीत शिव आरोग्य कवच योजना लागू करणाऱ्या शिवसेनेला पाच वर्षात ही योजना राबवता आलेली नाही, आता हीच योजना बाळासाहेबांच्या नावाने आणली जात आहे.


वचननामा : गोवंडी शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार

स्थिती: गोवंडी शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मागील पाच वर्षांत त्यांना याबाबत योग्य कार्यवाही करता आलेली नाही.


वचननामा : मधुमेहावर उपचार करणारी विशेष रुग्णालये उभारणार

स्थिती: मधुमेही रुग्णावर सर्व दवाखान्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिले जाणार होते, पण काही मोजकेच दवाखाने वगळता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सर्व दवाखान्यामध्ये या सुविधा देण्याचे वाचन पूर्ण न करणाऱ्या शिवसेनेने आता रुग्णालयात ही सेवा देण्याची गाजरे दाखवली आहेत.


वचननामा: आरोग्य सेवा आपल्या दारी

स्थिती: साथीच्या आजारांसंदर्भात प्रत्येक वस्तीत मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्य सेवा पुरवून रुग्णावर उपचार केले जातात. त्यामुळे आरोग्य वाहिनीतून आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य सुरुच असून, या सुरु असलेल्या कामांचा सेनेने आपल्या वचननाम्यात समावेश केला आहे.


वचननामा : सार्वजानिक स्वछतागृहात महिलांसाठी " सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन " ची सोय

स्थिती: महिलांसाठी " सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन " सार्वजनिक स्वच्छतागृहात बसविण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, महापालिका शाळांमध्ये अशाप्रकारे मशीन बसवण्यात येत आहेत.


वचननामा: देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार

स्थिती: देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे कचरा प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने पहिल्या सात वर्षांत कोणतेही काम केले नाही. त्यामुळे डिसेंबर 2015 मध्ये ट्यान्कजे कंत्राट रद्द करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता महापालिका स्वतःच प्रक्रिया करून त्यांनी वीज निर्मितीसाठी कंत्राट दाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे.


वचननामा : जुन्या विहिरी पूर्जीवीत करून त्यातील पाणी दैनंदिन वापरासाठी उपयोगात आणणार

स्थिती : सन 2009 मध्ये मुंबईत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे जुन्या विहिरींची साफसफाई आणि डागडुजी आणि दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही या विहिरीतील पाण्याचा उपयोग महापलिकेला करण्यात आलेला नाही. याचा फायदा टॅंकर लॉबीला झाला.


वचननामा : मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी गारगाई, पिजाळ हे प्रकल्प मार्गी लागणार

स्थिती: गारगाई, आणि पिंजाळ हे प्रकल्प सन 2017 मध्ये पूर्ण करून मुंबईकरांना 24 तास पाणी देणार होते, परंतु हे दोन्ही प्रकल्प अद्यापही कागदावरच आहेत.


वचननामा : उपनगरात मोगरा तसेच माहुल येथे पम्पिंग स्टेशन

स्थिती: सन 2007 पासून मोगरा आणि माहुल पम्पिग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरु अद्यापही या दोन्ही ठिकाणच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत


वचननामा : मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच

स्थिती : महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याची मागणी झाल्यानंतर बेस्ट तोट्यात असल्यामुळे अशी योजना राबवता येऊ शकत नाही, असे जाहीर केले आहे.


वचननामा: बस, मेट्रो, लोकल या सेवांकरिता एकाच संयुक्त पासची सुविधा देणार

स्थिती: मागील आठ वर्षांपासून याची केवळ चर्चाच असून, अद्यापही याची अंमलबजावणी करता आलेली नाही


वचननामा : डबेवाल्यासाठी तसेच नागरिकांसाठी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्टॅन्ड

स्थिती: रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्टॅन्ड सुरु करण्यात आलेले असून, चर्नी रोडसह घाटकोपर मध्ये असे स्टॅन्ड सुरु करण्यात आले आहेत.


वचननामा : सफाई कामगार तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना

स्थिती : सफाई कामगारांसाठी आश्रय योजना आणि वाल्मिकी योजना मागील 9 वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. पण अजूनही या योजनेचा लाभ सफाई कामगारांना मिळालेला नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा