Advertisement

कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देऊ - मुख्यमंत्री

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत कायद्याच्या स्तरावर टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि आम्ही ते देऊ, असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिलं आहे.

कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देऊ - मुख्यमंत्री
SHARES

मराठा आरक्षणाचा निर्णय एका दिवसात घेता येतो, असा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा, असं म्हटलं जातंय. त्यानुसार एका दिवसांत आरक्षणाचा निर्णय घेता येईल. पण ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळं सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत कायद्याच्या स्तरावर टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि आम्ही ते देऊ, असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिलं आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं आहे.


भावनेत वाहू नका

मराठा आरक्षणासाठी तरूण आत्महत्या करत असून जाळपोळ, दगडफेकीसारख्या घटनाही घडत असून या घटना व्यथित करणाऱ्या आहेत. त्यामुळं भावनेत वाहून जाऊ नका, असं आंदोलकांना सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आणि सर्व बाबींवर टिकणारं असं आरक्षण देणार, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तर सरकारने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची मागणी होत अाहे. मात्र, असं आरक्षण दिलं तर ते कायदेशीर बाबतीच टिकणार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आम्हीच मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि ते आरक्षण टिकणारं असेल, असा दावाही यावेळी केला आहे.
 

आम्हीच आरक्षण कायदा केला

आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी मागासवर्गीय आयोगही कामाला लागला आहे. आयोग सर्वांची मत जाणून घेत त्यादृष्टीनं वेगानं पुढची प्रक्रिया पार पाडत आहे. त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा लवकरच निकाली निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारला घेरणाऱ्या विरोधकांनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतरच मराठा आरक्षणाचा कायदा केला. इतकंच नव्हे तर आम्हीच मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला आहे.


स्मारकावरून राजकारण दुर्दैवी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून सुरू असलेल्या वादावरही यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टार्गेट केलं. स्मारकावरून राजकारण करणं हे दुर्दैवी असल्याचं म्हणत शिवाजी स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असाही दावा यावेळी करत स्मारकाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.



हेही वाचा - 

ठरलं...आठवले 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार

गणेशोत्सवातच खड्डे का बुजवले जातात ? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा