Advertisement

ठरलं...आठवले 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार

महाराष्ट्रात स्वतःचा हक्काचा सुरक्षित असा एक लोकसभा मतदारसंघ असावा यादृष्टीनं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा मतदारसंघांची चाचपणी करत दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाची निवड केली आहे.

ठरलं...आठवले 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार
SHARES

लोकसभा निवडणुकाचं बिगूल वाजायला अजून वेळ असला तरी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र लोकसभेच्या तयारीला सुरूवात केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आपला मतदारसंघही निवडला असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी दिली आहे.


दक्षिण-मध्य अारपीअायचा बालेकिल्ला

आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले अाहेत.  यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेले आहेत. तर पंढरपूर लोकसभा मतदार संघाचं विभाजन झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आठवले २००९ ला पराभूत झाले होते. दरम्यान, १९९८ मध्ये आठवले दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभेत गेले होते. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे चार खासदारही निवडून आले होते. त्यामुळे दक्षिण-मध्य मुंबई हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असल्याचं म्हणत आपण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघाची निवड केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


हक्काच्या मतदारसंघासाठी

महाराष्ट्रात स्वतःचा हक्काचा सुरक्षित असा एक लोकसभा मतदारसंघ असावा यादृष्टीनं आठवले यांनी लोकसभा मतदारसंघांची चाचपणी करत दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाची निवड केली आहे. तर मतदारसंघ निवडल्यानंतर आता आठवले यांनी कार्यकर्त्यांची एक विशेष बैठक घेत कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सुचनाही केल्या आहेत. सध्या दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे राहुल शेवाळे आहेत.


ठाण्यात महामेळावा

एकीकडं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देतानाच दुसरीकडं आठवले यांनी सभांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून रिपब्लिकन पक्षाचा ६१ वा स्थापना दिन ठाण्यात महामेळाव्याच्या स्वरूपात साजरा करण्याचंही ठरवलं आहे. त्यानुसार ३ आॅक्टोबरला ठाण्यात रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा पार पडणार असल्याचंही आठवले यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.



हेही वाचा -

 सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडतंय - धनंजय मुंडे

मागासवर्गीय अायोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण द्या - उद्धव ठाकरे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा