Advertisement

अमेरिकेत मुख्यमंत्र्यांचा गौरव


अमेरिकेत मुख्यमंत्र्यांचा गौरव
SHARES

अमेरिकेतील जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी, इंडिया इनिशिटिव्ह आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी वॉशिंग्टन येथे ‘आऊटस्टँडिंग लिडरशिप इन डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.  अमेरिकेच्या राजधानीत आज झालेल्या पुरस्कार वितरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.


वाहतूक व्यवस्थेसाठी गुंतवणूक

जागतिक बँकेने राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक सहकार्याची तयारी दर्शविली असून फोर्ड मोबिलिटी कंपनीकडून एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीसाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. फोर्ड मोबिलिटीच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि अध्यक्षा मर्सी क्लेव्होर्न तसेच मोबिलिटी मार्केटिंग अँड ग्रोथचे उपाध्यक्ष ब्रेट व्हेटली यांचीही मुख्यमंत्र्यांशी यावेळी चर्चा झाली. राज्यातील एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीसाठी ५०  दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३४१ कोटी रूपये) इतक्या गुंतवणुकीचा प्रस्ताव या समुहाने दिला आहे.

राज्यात स्मार्ट मोबिलिटी प्लान तयार करण्याच्या दृष्टीने हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी एमएमआरडीए आणि फोर्ड यांच्यात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यानुसार फोर्डने आपल्या निधीतून बसेस, रेल्वे, मेट्रो, ऑटो, टॅक्सी या सर्व वाहतूक साधनांचा समावेश असलेल्या प्रवाशांसाठीच्या सामायिक आराखड्याचा प्राथमिक अभ्यास केला आहे.हेही वाचा - 

परप्रांतीय कलाकाराची राज ठाकरेंना वाढदिवसाची अनोखी भेट

अमेरिकतील उपचारांनंतर मनोहर पर्रीकर गोव्यात परतलेसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा