Advertisement

अमेरिकतील उपचारांनंतर मनोहर पर्रीकर गोव्यात परतले

मनोहर पर्रीकर शुक्रवारी 15 जून रोजी मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटणार आहेत. यावेळी गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकही होणार असल्याची माहिती भाजपाच्या नेत्यांनी दिली.

अमेरिकतील उपचारांनंतर मनोहर पर्रीकर गोव्यात परतले
SHARES

अमेरिकेतील तीन महिन्यांच्या उपचारानंतर अखेर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (६२) गुरुवारी थेट मुंबईत पोहोचले. त्यानंतर अवघ्या एक तासानंतर ते गोव्याकडे रवाना झाले. मनोहर पर्रीकर शुक्रवारी १५ जून रोजी मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटणार आहेत. यावेळी गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकही होणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली.


प्रकृतीत सुधारणा

मनोहर पर्रीकर स्वादूपिंडाच्या कर्करोगानं त्रस्त होते.  ७ मार्चपासून त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. पर्रीकरांवरचे उपचार पूर्ण झाले असून आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात पर्रिकरांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी ते मुंबईत दाखल झाले. आता ते गोव्याला रवाना झाले असून त्यांनी मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.


त्यांच्या अनुपस्थितीत...

या तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा ताबा कुणाकडेही सोपवला नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीत गोव्याचा सरकारी कारभार चालवण्यासाठी त्यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली होती. अमेरिकेत असताना त्यांनी फोनवरून मंत्री आणि आमदारांशी संपर्क साधला होता आणि आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं होतं.


हेही वाचा - 

मनोहर पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा