Advertisement

मनोहर पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

स्वादूपिंडाच्या दुखण्याने त्रस्त पर्रिकर सोमवारी पुन्हा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार बुधवारी पहाटे ते अमेरिकेच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

मनोहर पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेला रवाना
SHARES

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (६२) अखेर उपचारांसाठी बुधवारी अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील 'मेमोरिअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर' या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


स्वादूपिंडाच्या दुखण्याने त्रस्त पर्रिकर सोमवारी पुन्हा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. पण त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याची माहिती सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली होती. मात्र लिलावती रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावलं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार बुधवारी पहाटे ते अमेरिकेच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.


राज्यपालांना पत्र

त्याआधी ५ मार्च रोजी पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याची माहिती पर्रिकर यांनी गोव्याचे राज्यपाल मृदूला सिन्हा यांना पत्र लिहून दिली. गोवा, मुंबई आणि परदेशातील डाॅक्टरांनी माझ्यावरील उपचार परदेशात करण्याचा सल्ला मला दिला आहे. त्यामुळे मी काही दिवस परदेशात जात आहे, अशी माहिती पत्राद्वारे दिली आहे.


 

कॅबिनेट सल्लागार समिती 

आपल्या अनुपस्थितीत राज्य प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी कॅबिनेट सल्लागार समिती नेमण्यात आली अाहे. या समितीत फ्रान्सिस डिसुझा (भाजपा), सुदीन ढवळीकर (मगोप) आणि विजय सरदेसाई (गोवा फाॅरवर्ड पार्टी) यांचा समावेश आहे.


प्रशासनाला मार्गदर्शन

ही समिती आठवड्यातून एकदा बैठक घेऊन प्रशासनाला मार्गदर्शन करेल. खासकरून आर्थिक नियोजनाबाबतचे निर्णय अर्थ खात्याच्या सल्लाने होतील. या समितीच्या अध्यक्षपदी मी व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिल. माझ्या अनुपस्थितीत कॅबिनेटमधील एक मंत्री अध्यक्षस्थानी असेल. यासंदर्भात मुख्य सचिवांना कळवण्यात येईल. असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पर्रिकर १५ फेब्रुवारी रोजी लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारीला लिलावतीतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट गोवा विधानसभेत पोहोचले. तिथं त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर केला.


स्लोन केटरिंग सेंटरचं वैशिष्ट्य 

  • न्यूयाॅर्कच्या अप्पर वेस्ट साईड मॅनहॅटन परिसरातील विस्तीर्ण जागेवर हे सेंटर उभारण्यात आलं आहे.
  • या सेंटरची स्थापना १८८४ मध्ये करण्यात आली होती.  
  • कॅन्सरच्या आजारावर उपचार करणारं हे जगातलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात मोठं खासगी सेंटर आहे.
  • एकूण ४७३ खाटांचं हे सेंटर आहे.
  • कॅन्सरवरील उपचारांबाबत अनेक महत्त्वाचे संशोधन या सेंटरच्या नावावर जमा आहेत.हेही वाचा-

मनोहर पर्रिकर पुन्हा लिलावतीत, पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता

...तरी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेन - मनोहर पर्रीकरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा