तटकरेंविरोधात गाडीभर पुरावे देणारे मुख्यमंत्रीच करणार त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

  Prabhadevi
  तटकरेंविरोधात गाडीभर पुरावे देणारे मुख्यमंत्रीच करणार त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
  मुंबई  -  

  असे म्हणतात राजकारणात कुणी कुणाचे शत्रू नाही, तर कुणी कुणाचे मित्र नसतात. झाले गेले गंगेला मिळाले असेच काहीसे राजकारणात पाहायला मिळते. याचाच प्रत्यय 9 तारखेला म्हणजे सोमवारी पाहायला मिळणार आहे. तेही एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात. माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर मुख्यमंत्री आणि भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याच तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीवर लिहिलेल्या 'समग्र' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत.

  सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला 30 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणारे 'समग्र' हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात 9 ऑक्‍टोबरला हा कार्यक्रम होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अभिनेते नाना पाटेकर आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.


  राज्यात जलसंपदा प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही पुरेशा प्रमाणात सिंचन झाले नसल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला होता. त्याबाबत चौकशी करण्यासाठी माधवराव चितळे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीसमोर बैलगाडीभरून फडणवीस यांनी पुरावे सादर केले होते. तटकरे यांच्यावर त्यांनी भरपूर टीकाही केली होती. जलसंपदा विभागाच्या कारभारावर श्‍वेतपत्रिकाही काढण्यात आली होती. कोंढाणे धरणातील कथित गैरव्यवहाराबाबत तटकरे यांच्याविरुद्ध न्यायलयीन प्रक्रिया सुरू आहे.


  मात्र हे सगळे विसरून तटकरे आणि फडणवीस एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे विरोधी बाकावर वारेमाप आरोप करणारे फडणवीस तटकरेंची स्तुती करतील का? हा देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


  हेही वाचा - 

  लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार - मुख्यमंत्री

  तटकरेंच्या अडचणीत वाढ? सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.