Advertisement

मुंबईत बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक


मुंबईत बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक
SHARES

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक लवकरच मुंबईत उभारण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वायपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत केली. या सभेनंतर वाजपेयी यांचे अस्थिकलश गोदावरी, पंचगंगा आणि चंद्रभागा सहित राज्यातील १४ नद्यांमध्ये विसर्जित करण्यासाठी भाजपा नेत्यांना सोपवण्यात आले.

वाजपेयी यांचं १६ आॅगस्ट रोजी दिल्लीत वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर देशभरात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.



वाजपेयींकडून शिकलो देशभक्ती

या श्रद्धांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, वाजपेयी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशाला समर्पित केलं होतं. देशभक्ती त्यांच्याकडून शिकली पाहिजे. त्यांचं जाणं ही देशासाठी मोठी हानी आहे. राजनितीपासून ते समाजसेवेपर्यंत त्यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आहे.



पदराला विरोध

महिलांना पदराआड ताेंड लपवण्याच्या प्रथेला वाजपेयी यांचा विरोध होता. भलेही आज माझं म्हणणं कुणी ऐकणार नसलं, तरी पुढे जाऊन माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांना कळेल, असं ते म्हणायचे.

या श्रद्धांजली कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदी मंत्री देखील उपस्थित होते.



हेही वाचा-

भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

देशात सध्या भीतीचं वातावरण- कन्हैया कुमार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा