Advertisement

देशात सध्या भीतीचं वातावरण- कन्हैया कुमार

मुंबई पत्रकार संघाने अायोजीत केलेल्या कार्यक्रमात कन्हैया कुमार म्हणाला की, ज्यांनी बोलायला हवं अाणि प्रश्न विचारायलं हवं ते मात्र काहीच बोलत नाहीत. अाम्ही प्रश्न विचारले तर अामचा अावाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण अामचा अावाज दाबवण्याचा प्रयत्न केला तर तो तेवढ्याच वेगाने बाहेर येईल.

देशात सध्या भीतीचं वातावरण-  कन्हैया कुमार
SHARES

सरकारविरोधात जो अावाज उठवतो त्याला सध्या दाबण्याचा प्रयत्न होत आहे.  उमर खालिदवरील हल्ल्यातून हेच दिसून येत आलं. देशात भीतीचं वातावरण तयार केलं तरच सरकारला निवडणुका जिंकण्याची खात्री वाटतेय. त्यामुळेच देशात जाणीवपूर्वक भीतीचंं वातावरण तयार केलं जात असल्याचा अारोप जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमारने बुधवारी केला.


ट्रोल करून धमकावलं जातं

मुंबई पत्रकार संघाने अायोजीत केलेल्या कार्यक्रमात कन्हैया कुमार म्हणाला की, ज्यांनी सरकारविरोधात बोलायलं हवं अाणि प्रश्न विचारायलं हवं ते काहीच बोलत नाहीत. अाम्ही प्रश्न विचारले तर अामचा अावाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण अामचा अावाज दाबवण्याचा प्रयत्न केल्यास तो तेवढ्याच वेगाने बाहेर येईल. सोशल मीडियावरून प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोल करून धमकावलं जात आहे. बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. तरीही,या लोकांना अटक केली जात नाही. कारण त्यांना रोखलं तर देशातील समस्यांवर बोलावं लागेल. म्हणून निवडणुकांपूर्वी देशात भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे. 


संयुक्त आघाडी व्हावी 

सध्या देशात भक्कम पर्यायाची गरज अाहे. त्यासाठी किमान समान कार्यक्रमावर संयुक्त आघाडी होणं अावश्यक अाहे. संवैधानिक मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांनी या आघाडीत सामील व्हावं, असं आवाहन करून कन्हैया कुमार म्हणाला, अागामी निवडणुकीत रोजगार नाही तर मत नाही या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधणार अाहे. 




हेही वाचा -

भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा