Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सअॅपवर

मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, सरकारी योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती आता या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सअॅपवर
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आता व्हॉट्सअॅपच्या (whats app) माध्यमातून राज्यातील जनतेशी थेट 'कनेक्ट' झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाचे 'सीएमओ महाराष्ट्र' (CMO Maharashtra) हे व्हॉट्सअॅप चॅनल सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, सरकारी योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती आता या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

जगात संवादाचे प्रभावी आणि उपयुक्त माध्यम बनलेल्या व्हॉट्सअॅपने वाहिन्यांद्वारे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून काल १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र चॅनल सुरू करण्यात आले आहे. या प्रमाणित चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि चॅनल सुरू केल्यानंतर अल्पावधीतच 40 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी चॅनलला फॉलो केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. याची अंमलबजावणी करताना लोकाभिमुख योजना आणि विकास प्रकल्पांची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जेणेकरून शासनाच्या योजना आणि निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यास त्यांना लाभ मिळू शकेल. 

मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कार्यालयामार्फत सध्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, थ्रेड्स, कू, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया तसेच इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स यांसारख्या सोशल मीडियाचा वापर जनतेला माहिती देण्यासाठी केला जातो. 

व्हॉट्सअॅपने गेल्या आठवड्यात चॅनेलची घोषणा केल्यानंतर, मुख्यमंत्री सचिवालयाने कंपनीशी संपर्क साधला आणि बुधवारी 'सीएमओ महाराष्ट्र' नावाचे स्वतंत्र, प्रमाणित चॅनल सुरू करण्यात आले. काही तासांतच 40 हजारांहून अधिक युजर्सने या चॅनलला फॉलो केले आहे.



हेही वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 'व्हिडिओ' व्हायरल!

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी समितीची स्थापना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा