Advertisement

नांदगावकर, देशपांडे यांच्यात खटकेबाजी!

मनसेचे एकमेव 'एल' वाॅर्डचे नगरसेवक संजय तुर्डे यांना गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक निधीतून कोणतंही काम करू दिली जात नाही, असा मनसेचा आरोप आहे. या विभागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा तुर्डेंचा प्रयत्न असताना त्यांच्या कामात अडथळे आणले जात असल्याचंही मनसेचं म्हणणं आहे.

नांदगावकर, देशपांडे यांच्यात खटकेबाजी!
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन वा मोर्चा म्हटला की राडा खळ्ळखट्याक आणि फटकेबाजी आलीच. पण गुरूवारी मुंबई महापालिकेच्या 'एल' वाॅर्ड कार्यालयात मनसे नेत्यांमध्येच खटकेबाजी दिसून आली. 'एल' वाॅर्डमधील आंदोलनाच्या वेळी उपस्थित असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यामध्येच खटके उडाले. अधिकाऱ्यांशी बोलत असताना शांत राहण्याचा नांदगावकर यांनी दिलेला सल्ला देशपांडे यांना न पटल्याने ते चिडले आणि तणतणत बैठकीतून निघून गेले.


मोर्चाचं कारण काय?

मनसेचे एकमेव 'एल' वाॅर्डचे नगरसेवक संजय तुर्डे यांना गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक निधीतून कोणतंही काम करू दिली जात नाही, असा मनसेचा आरोप आहे. या विभागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा तुर्डेंचा प्रयत्न असताना त्यांच्या कामात अडथळे आणले जात असल्याचंही मनसेचं म्हणणं आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी गुरूवारी मनसेकडून एक मोर्चा 'एल' विभाग कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात नांदगावकर आणि देशपांडे दोघेही सहभागी होते.


वाद कशामुळे?

या मुद्द्यावर मनसेचे नेते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बोलणं सुरू असताना महापालिका अधिकारी तसंच देशपांडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. देशपांडे यांचा आवाज चढल्याने नांदगावकरांनी देशपांडे यांना शांत राहण्यास सांगत अधिकाऱ्यांना बोलू दिलं. नांदगावकरांची ही सूचना देशपांडे यांना खटकल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला. मनसेतील नेत्यांमधील या खटकेबाजीची चर्चा त्यानंतर सर्वत्रच सुरू झाली असून मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचीही चर्चा रंगली आहे.


मतभेद नाहीच

याविषयी 'मुंबई लाइव्ह'ने देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नांदगावकर आणि आपल्यात काही वाद झाल्याचं वा मतभेद असल्याच्या वृत्ताला स्पष्ट नकार दिला आहे. बैठकीच्या दरम्यान महापालिका अधिकारी काहीही बोलत होते त्यामुळं आपला आवाज चढला, त्यानंतर अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली नि आपण तिथून शांतपणे निघून गेलो. पण नांदगावकरांवर रागवून वा चिडून आपण तिथून निघालो नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.



हेही वाचा-

तर, राम मंदिर उभारण्यासाठी १ हजार वर्षे लागतील- संजय राऊत

फेरीवाला धोरणाची नीट अंमलबजावणी करा नाहीतर.., राज यांचा आयुक्तांना इशारा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा