Advertisement

शिक्षक भरतीवरून शिक्षणमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात 'ट्विटरवॉर'

राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा ६ महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारीत केली होती. परंतु अद्याप शिक्षक भरती झालेली नाही. या भरती परीक्षांसाठी दिवसरात्र तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? असा सवालही खासदार सुप्रिया सुुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारला.

शिक्षक भरतीवरून शिक्षणमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात 'ट्विटरवॉर'
SHARES

महाराष्ट्रातील रखडलेल्या शिक्षक भरतीवरून शिक्षणमंत्री विनोद तावडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुुळे यांच्यात ट्विटरवॉर रंगलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं सोशल मीडियावर 'जवाब दो ही' हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. या हॅशटॅगचा वापर करून राष्ट्रवादीनं महागाई, इंधनदरवाढ यांसह विविध मुद्दांना हात घातला आहे. हाच हॅशटॅग वापरत सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शिक्षक भरतीचा मुद्दा घेऊन एक ट्विट केलं.


शिक्षक भरतीचा मुद्दा

राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा ६ महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारीत केली होती. परंतु अद्याप शिक्षक भरती झालेली नाही. या भरती परीक्षांसाठी दिवसरात्र तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? असा सवालही खासदार सुप्रिया सुुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी #जवाब दो वापरत ट्विट केलं.


शिक्षणमंत्र्यांचा पलटवार

१५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी एकही पद भरलं नाही. आज बहुतांश संस्थांचालक त्यांचेच आहेत. जे कोर्टात जाऊन सरकारच्या ऑनलाईन भरतीवर स्थगिती आणतात. मराठा आरक्षण हा मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात. वर यांचेच नेते शिक्षकभरती होत नाही अशी सोशल मीडियावर टिवटिव करतात. अशा शब्दात सुप्रिया सुळेंच्या ट्विटला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरूनच उत्तर दिलं आहे.


भरती होणारच

त्याशिवाय शिक्षणात राजकारण केलेले खपवून घेणार नाही. संस्थाचालकांनी कितीही प्रयत्न केले आणि विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी आमचं सरकार शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी खंबीरपणे उभं आहे. पद भरती होणार होणार होणार! असंही सांगितलं आहे.हेही वाचा-

काँग्रेसच्या सचिवपदावरून प्रिया दत्त यांची उचलबांगडी

धक्कादायक! संभाजी भिडे यांना सरकारचं अभय, ६ गुन्हे घेतले मागे


 

संबंधित विषय
Advertisement