अखेर तटकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी


SHARE

सिंचन घोटाळ्याचे आरोप असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जीवनावर आधारित 'समग्र' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली. तटकरे यांच्यासोबत मंचावर बसण्याचे टाळण्यासाठी त्यांनी या सोहळ्याला जाण्याचं जाणीवपूर्वक टाळलं.

सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीला सोमवारी ३० वर्षे पूर्ण झाली. याचं औचित्य साधून मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.


अटकेची केली होती मागणी

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण होतं. मात्र सिंचन घोटाळ्यांवरुन ज्या व्यक्तीच्या अटकेची मागणी फडणवीस यांनी केली त्याच व्यक्तीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.


भाजपाचे नेते हजर

मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं असलं, तरी भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीष बापट यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. नारायण राणे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.हेही वाचा -

सत्तेबाहेरचा काळ माणसं ओळखायला शिकवणारा - सुनील तटकरेडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय