'छगन कमळ बघ' अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर

अजित पवारांच्या 'फडण दोन शून्य' या टीकेला मुख्यमंत्र्यांनी 'छगन कमळ बघ, शरद गवत आण' अशी वाक्य असलेले बालभारतीच्या पुस्तकातलं उतारे वाचून चोख प्रत्युत्तर दिलं.

SHARE

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. बालभारतीच्या या नवीन संख्यावाचनावर सर्वच स्तरातून सडकून टीका होत आहे. तसंच, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडत, मुख्यमंत्र्यांनी आशीष शेलारांना सांगून हा बदल रद्द करावा अशी मागणी केली. त्याशिवाय, 'फडणवीसांना फडण दोन शून्य, बावनकुळेंना पन्नास-दोन-कुळे असं म्हटलं तर चालेल का?' असा खोचक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

तज्ज्ञांची समिती

अजित पवारांच्या 'फडण दोन शून्य' या टीकेला मुख्यमंत्र्यांनी 'छगन कमळ बघ, शरद गवत आण' अशी वाक्य असलेले बालभारतीच्या पुस्तकातलं उतारे वाचून चोख प्रत्युत्तर दिलं. त्याचप्रमाणं, 'पुस्तकातील संख्यावाचनाबद्दल काही आक्षेप असल्यास त्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात येईल', असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं.

नवीन पद्धत

मुलांना जोडाक्षरं वाचता येत नसल्यानं आकडे वाचनाची नवीन पद्धत बालभारतीनं आखून दिली. त्यानुसार बाराला दहा-दोन, तेवीसला वीस-तीन असं शिकविण्यास सांगितलं. मात्र, या बदलावर सर्वच स्तरातून टीका होते असल्यानं बालभारतीनं केलेले बदल आता मागे घेतले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

अभिनेत्री केतकी चितळे घेणार राज ठाकरेंची भेट

कलानगर येथील स्कायवॉक पाडण्यासाठी महामार्गावर मेगाब्लॉकसंबंधित विषय
ताज्या बातम्या