Advertisement

राज्यात दिर्घकाळ मुख्यमंत्री राहणं अवघड- देवेंद्र फडणवीस

राज्यात दिर्घकाळ मुख्यमंत्री राहणं अवघड आहे. मी इथं येताना विचार करत होतो की सुश्रुषाच्या व्यवस्थापनाने हा प्रकल्प लवकर केला की मी दिर्घकाळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलोय. ३ वर्षांपेक्षाही कमी कालावधीत रुग्णालय बांधून पूर्ण करणं ही मोठी कौतुकास्पद कामगिरी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात दिर्घकाळ मुख्यमंत्री राहणं अवघड- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्यातील मुख्यमंत्र्याने एखाद्या प्रकल्पाचं भूमिपूजन करावं आणि तो प्रकल्प पूर्ण होऊन त्याचा उद्घाटन सोहळाही त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा, असं राज्यात क्वचितचं घडलं असेल. महाराष्ट्राला दिर्घकाळ एकच मुख्यमंत्री लाभण्याची परंपरा नाही, असं सूचक वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पुन्हा मोकळी वाट करून दिली. फडणवीस विक्रोळीतील सुश्रुषा रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.


आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

''राज्यात दिर्घकाळ मुख्यमंत्री राहणं अवघड आहे. मी इथं येताना विचार करत होतो की सुश्रुषाच्या व्यवस्थापनाने हा प्रकल्प लवकर केला की मी दिर्घकाळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलोय. ३ वर्षांपेक्षाही कमी कालावधीत रुग्णालय बांधून पूर्ण करणं ही मोठी कौतुकास्पद कामगिरी आहे.''



दादर आणि आसपासच्या रूग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या सुश्रुषा रुग्णालय व्यवस्थापनाच्या नव्या शाखेच्या माध्यमातून आता विक्रोळीतील रूग्णांनाही दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.


विक्रोळीत ६ मजली रुग्णालय

विक्रोळीतील कन्नमवार नगर २ येथील विकास काॅलेज मैदान इथं शुश्रुषा, सुमन रमेश तुलसियानी रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. या ६ मजली रुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, तंत्र व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाय महाडेश्वर आदी उपस्थित होते.



कुठल्या सुविधा?

या रुग्णालयात बाह्यरूग्ण विभाग, बाह्य रूग्ण कक्ष, आपत्कालीन विभाग, प्रक्रिया-लघु शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, नातेवाईक प्रतिक्षा कक्ष, डायलिसिस विभाग, फिजिओथेरपी, प्रसूती विभाग, बेबी इन्कुबेटर कक्ष, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, दोन आॅपरेशन थिएटर, निर्जंतुकीकरण विभाग अशा अनेक सुविधा विक्रोळीकरांना उपलब्ध होणार आहेत.



हेही वाचा-

हवाई प्रवासाचा मुख्यमंत्र्यांचा वर्षाकाठी ६ कोटींचा खर्च

जाहिरातबाज मोदी सरकारची ४ हजार कोटींची उधळण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा