Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातात बचावले

शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेसाठी आले होते. पेण-बोरगाव येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होताना हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातात बचावले
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागचं हेलिकॉप्टर अपघाताचं विघ्न काही संपत नाही. पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. हेलिकॉप्टर लँड होताना पायलटचं नियंत्रण सुटलं. मात्र वेळीच पायलट प्रसंगावधान दाखवत हेलिकाॅप्टरवर पुन्हा नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेसाठी आले होते. पेण-बोरगाव येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होताना हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली. त्यामुळे पायलटचं हेलिकाॅप्टरवरील नियंत्रण सुटलं. मात्र, तात्काळ  प्रसंगावधान दाखवत पायलटने हेलिकाॅप्टरवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसहीत इतरांनी सुखरूप खाली उतरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यासह हेलिकाॅप्टरमध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक, एक इंजिनिअर, पायलट आणि को-पायलट असे पाच जण होते. 

पावसामुळे माती ओली होऊन हेलिकाॅप्टरची चाके चिखलात रुतली असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले.  या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाले होते. त्यात ते बचावले होते. आता पुन्हा एकदा अपघातातून ते बचावले आहेत. हेही वाचा -

शिवसेना-भाजपचा वेगवेगळा जाहीरनामा, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध

Maharashtra Assembly Election: गोची! काँग्रेसच्या प्रचारास उर्मिलाचा ठाम नकार!!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा