Advertisement

घरे पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

गरीबांच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

घरे पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
SHARES

राज्यातील गोरगरीब जनेतेच्या असंख्य दैनंदीन समस्या आहेत. या समस्यांकडे दुर्लक्ष करून घरे पेटवणं सोपं असतं; पण गोरगरीबाच्या घरची चूल पेटवणं तेवढंच कठीण. त्यामुळे गरीबांच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 

औरंगबादमध्ये 'अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०'चे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. 'राज्यातील अनेक राजकीय अडचणींवर मात करुन हे सरकार स्थापन झालं आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार असून मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करायचं आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'कृषी आणि उद्योग यांची सांगड घालून  राज्यात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही. महाराष्ट्राला रडण्याची नव्हे, तर लढण्याची परंपरा आहे', असंही मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा- 

राज ठाकरेंसोबत बैठक, फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांवर शरद पवार नाराज?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा