Advertisement

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांवर शरद पवार नाराज?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील प्रमुख उद्योगपतींसोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीपासून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना दूर ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांवर शरद पवार नाराज?
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील प्रमुख उद्योगपतींसोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीपासून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना दूर ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

हेही वाचा-  ‘फ्री काश्मिर पोस्टर’ झळकवल्या प्रकरणी चौकशी करू- अनिल देशमुख

राज्यातील उद्योगधंदे वाढीस लागावे, उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने सीआआय आणि राज्य सरकारच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी उद्योजक उपस्थित होते. तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्धव यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब हे या बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याकडे अर्थ आणि नियोजन खातं देखील असल्याने या बैठकीला त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. परंतु त्यांना या बैठकीचं आमंत्रण होतं की नाही, हे कळू शकलं नाही. परंतु त्यांना जाणीवपूर्वक बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- JNU Protest: असले प्रकार भाजपवाले करायचे, असं का म्हणाले पवार? 

ही बाब शरद पवार यांच्या कानावर गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकार तिन्ही पक्षांचं सरकार असल्याने मुख्यमंत्र्यांनी समन्वयाने निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं त्यांना वाटतं. त्यामुळे ते आपली नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा