Advertisement

महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आश्वासन

महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधताना राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आश्वासन
SHARES

महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधताना राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृहात या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.  

या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया या उद्योजकांसोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक

मुख्यमंत्री उद्योजकांशी संवाद साधताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये कुठल्याही कारणांमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले असतील. परंतु आता तसं होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाईल. उलट राज्याबाहेरील उद्योग महाराष्ट्रात कसे येतील, यासाठी आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. जमिनीची उपलब्धता, वीजेचा दर, रस्ते, पाणी, दळणवळण सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

शिवाय कुठल्याही विकासकामांना स्थगिती न देता महत्त्वाचे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याकडे सरकारचा भर असेल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना आश्वस्त केलं.

हेही वाचा- मनसेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा