Advertisement

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नियमानुसारच, महापालिकेची हायकोर्टाला माहिती

शिवाजी पार्क मैदान नियमानुसार ​शपथविधी सोहळ्यासाठी​​​ उपलब्ध करून दिल्याची माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नियमानुसारच, महापालिकेची हायकोर्टाला माहिती
SHARES

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरील भव्यदिव्य सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत शिवाजी पार्क मैदान नियमानुसार शपथविधी सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली.

विकाॅम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत शिवाजी पार्क हे मैदान खेळाचं मैदान आहे की सार्वजनिक कार्यक्रमांचं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या याचिकेवर न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. आर. आय छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा- पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन

या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेकडून उत्तर मागितलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना महापालिकेने न्यायालयाला सांगितलं की, २०३४ च्या विकास आराखड्यात शिवाजी पार्क मनोरंजन मैदान म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. जानेवारी २०१६ च्या अधिसूचनेनुसार शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा पार पाडण्याची परवानगी देण्यात आली हाेती. शिवाजी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २० जानेवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून वर्षातील ४५ दिवस शिवाजी पार्कचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी करण्याची मुभा दिली आहे. त्यापैकी ७ दिवस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनासाठी राखून ठेवले आहेत.

राज्याच्या मुख्य सचिवांनी २७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार महापालिकेने या सोहळ्यासाठी परवानगी दिली, अशी माहिती महापालिकेने दिली. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा