Advertisement

विमानतळावरही मतदान जागरूकता अभियान

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरही मतदान जाकरूकता अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ एप्रिल रोजी मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

विमानतळावरही मतदान जागरूकता अभियान
SHARES

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरही मतदान जाकरूकता अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ एप्रिल रोजी मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.


मतदानाचं आवाहन

मुंबई आणि मुंबई उपनगरात येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना जागरूक करण्यासाठी विमानतळांवरही मतदान जागरूकता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळांव्यतिरिक्त रेल्वे स्टेशन आणि बस डेपोंमध्येही हे अभियान राबवण्यात येणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-पूर्व या ४ मतदारसंघांचा समावेश होतो. मुंबईच्या मतदानाची तारीख चौथा शनिवार, रविवार आणि १ मे दरम्यान असल्यानं मतदार लाँग विकेंडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांच्या जागरूकतेसाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.


रेल्वे, बसमध्येही घोषणा

अधिकाऱ्यांनी रेल्वेमध्ये तसंच बेस्टच्या बसमध्येही निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच अंगणवाडी सेवक आणि आरोग्य सेवकांनाही झोपड्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात जाऊन मतदारांना जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -

'राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच' – उर्मिला मातोंडकर

राज कॉमेडियन, तर दादा हुलपट्टू; तावडेंचा उपरोधीक टोलाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा