Advertisement

मुंबईत काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने; ‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरुन आदोलन

‘पेगॅसस’च्या मुद्य्यावरून बुधवारी मुंबईत काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत.

मुंबईत काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने; ‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरुन आदोलन
SHARES

‘पेगॅसस’च्या मुद्य्यावरून बुधवारी मुंबईत काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. काँग्रेसने या मुद्य्यावरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केलं. भाजपाच्या दादरमधील कार्यालयसमोर आंदोलन सुरू केलं. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला विरोध केला.

भाजपा नेते प्रसाद लाड आणि काँग्रेसचे नेते झिशान सिद्धिकी हे कार्यकर्त्यांसाह रस्त्यावर आमनेसामने आले आहेत. दादर पूर्व परिसरात हा गोंधळ सुरू झाला आहे. पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

एकीकीडे आंदोलनासाठी काँग्रेस कार्यकर्ते आल्याचे पाहून दुसऱ्या बाजुला भाजपाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवारण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा