Advertisement

दहिसरमध्ये काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


दहिसरमध्ये काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
SHARES

दहिसर - एसव्ही रोड येथील चंद्रा इमारतीत काँग्रेसचे नवीन जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक 6 मधील कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस नेता आणि आमदार भाई जगताप यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी भाई जगताप यांनी काँग्रेसला मतदान करा असे आवाहन केले. तसेच काँग्रेसमध्ये चाललेल्या अंतर्गत वादावरही भाई जगताप यांनी प्रतिक्रीया दिलीय. अंतर्गत वादावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा मुंबईतल्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असे भाई जगताप यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात वॉर्ड क्रमांक 6 चा विकास होणार असे आश्वासन काँग्रेसचे उमेदवार सुभाष नहिरे यांनी दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा