Advertisement

RSS मानहानी प्रकरण: आधीपेक्षा दहापट त्वेषाने लढणार- राहुल गांधी

आरएसएस मानहानी प्रकरणात शिवडी कोर्टाने राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुनावेळी राहुल यांनी आपली बाजू मांडताना आपण दोषी नसल्याचं कोर्टाला सांगितलं.

RSS मानहानी प्रकरण: आधीपेक्षा दहापट त्वेषाने लढणार- राहुल गांधी
SHARES

सामाजिक कार्यकर्ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS)चा  संबंध जोडल्याप्रकरणी मुंबईतील शिवडी कोर्टात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिवडी कोर्टाने राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुनावेळी राहुल यांनी आपली बाजू मांडताना आपण दोषी नसल्याचं कोर्टाला सांगितलं.

लढा सुरूच राहील

लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल यांनी आरएसएसशी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध जोडणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर आरएसएसने राहुल यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. अशाच एका प्रकरणात कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्यावरही मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गुरूवारी सुनावणी असल्याने राहुल सकाळीच शिवडी कोर्टात पोहोचले. कोर्टासमोर हजर राहिल्यावर  राहुल यांनी मी आपल्या वक्तव्यावर ठाम असून या प्रकरणी दोषी नसल्याचं सांगितलं.

तसंच कोर्टाबाहेर येऊन प्रसार माध्यमांशी बोलताना संघाविरोधातील लढा पुढेही सुरूच राहील. गेल्या ५ वर्षांतील माझी लढाई दहापट ताकदीने लढेन, असं वक्तव्य केलं.

आणखी ४ खटले

या व्यतिरिक्त राहुल यांना आणखी ४ प्रकरणांसाठी देशातील वेगवेगळ्या कोर्टात हजर राहावं लागणार आहे. आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी राहुल यांच्या विरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. चंपानेरकर यांनी दोन्ही नेत्यांकडून १ रुपयाची मागणी केली आहे. आरएसएसला गौरी लंकेश यांच्या हत्येशी जोडून राहुल यांनी संघटनेची बदनामी केल्याचं चंपानेरकर यांचं म्हणणं आहे.

‘हे’ राहिले जामिनदार

राहुल यांचं म्हणणं ऐकूण घेतल्यावर शिवडी कोर्टाने राहुल यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड आणि नसीम खान यांनी राहुल गांधी यांच्यासाठी जामीनपत्र दिलं.    हेही वाचा-

'त्या' ट्विटप्रकरणी राहुल गांधी शिवडी कोर्टात हजर राहणार

बाळासाहेब थोरात होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? लवकरच होणार नावाची घोषणाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा