Advertisement

नाश्त्यानंतर सुरू झालं नि जेवणाला संपलं, काँग्रेसच्या उपोषणावर टिकेची झोड

राहुल गांधी यांच्या हाकेनुसार दलित अत्याचारविरोधात मुंबईतील काँग्रेस-नेत्यांकडून आझाद मैदान इथं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार होतं. सकाळी १० वाजता उपोषण सुरू होणार असताना मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह सर्वच नेते-कार्यकर्ते सव्वा अकराला पोहोचले आणि त्यानंतर कुठं उपोषण सुरू झालं. हे उपोषण सुरू होत नं होत तेच दुपारी अडीचच्या सुमारास संपलंही. केवळ ३ तासांत.

नाश्त्यानंतर सुरू झालं नि जेवणाला संपलं, काँग्रेसच्या उपोषणावर टिकेची झोड
SHARES

दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने एक दिवस लाक्षणिक उपोषणाची हाक देत सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याचा डाव आखला खरा; पण हा डाव काँग्रेसवरच उलटला आहे. देशाच्या इतिहासातलं हे अनोखं उपोषण सोमवारी मुंबईसह दिल्लीतही पार पडलं. नाश्त्याची वेळ संपल्यानंतर म्हणजेच सव्वा अकराला मुंबईत काँग्रेस नेत्यांचं-कार्यकर्त्यांच उपोषण सुरू झालं अन् दुपारी जेवणाच्या वेळेस, अडीचच्या सुमारास हे उपोषण संपलं देखील. १२ तास सोडाच, पण ६ तासही उपोषणकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना तग धरता आला नाही.

भरल्यापोटी उपोषण

इतकंच काय तर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनीही छोले-भटुऱ्यावर ताव मारत उपोषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दुपारी १ नंतर उपोषणासाठी राजघाटावर पोहोचले. भरल्या पोटी, तीन तासांतच झालेल्या या उपोषणामुळे काँग्रेसची पोलखोल झाली असून भाजपाबरोबरच सर्वसामान्यांकडूनही उपोषणाची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. भाजपानं तर यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्यानं उपोषणाचं आंदोलन काँग्रेसच्याच अंगलट आलं आहे.

कारण काय?

राहुल गांधी यांच्या हाकेनुसार दलित अत्याचारविरोधात मुंबईतील काँग्रेस-नेत्यांकडून आझाद मैदान इथं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार होतं. सकाळी १० वाजता उपोषण सुरू होणार असताना मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह सर्वच नेते-कार्यकर्ते सव्वा अकराला पोहोचले आणि त्यानंतर कुठं उपोषण सुरू झालं. हे उपोषण सुरू होत नं होत तेच दुपारी अडीचच्या सुमारास संपलंही. केवळ ३ तासांत.

काय म्हणाले निरूपम?

याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांना मीडियानं छेडलं असता निरूपम यांनी किती तास उपोषण करायचं, किती वाजता सुरू करायचं नि किती वाजता संपवायचं असं आम्ही काहीही ठरवलं नव्हतं. तर हे सांकेतिक उपोषण असल्याचं म्हणत वेळ मारून नेली. एवढंच नाही, तर वेळ न पाळल्याचं खापरं मीडिया आणि भाजपावरही फोडलं. मीडिया आणि भाजपा जाणिवपूर्वक काँग्रेसच्या उपोषणावर टीका करत असल्याचं निरूपम यांनी म्हटलं.

मोठी शोकांतिका

महात्मा गांधी यांनी जगाला उपोषणाचं हत्यार दिलं. ज्या महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करून काँग्रेस राजकारण करते त्या काँग्रेसला ३ तासही तग धरता आला नाही, यापेक्षा मोठी शोकांतिका असून शकत नाही, असं म्हणत नेटकरीही काँग्रेसवर चांगलेच तुटून पडले आहेत.

हेही वाचा-

रिलायन्सने ठोकला संजय निरूपम यांच्यावर १ हजार कोटींचा दावा

आता एनएमसी बिलासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचं आमरण उपोषण!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा