शिवसेना-भाजपा युती तुटणं हे ढोंग - सुरजेवाला

 Mumbai
शिवसेना-भाजपा युती तुटणं हे ढोंग - सुरजेवाला
Mumbai  -  

दादर - टिळक भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने वरिष्ठ नेता आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सुरजेवाला यांनी शिवसेना - भाजपावर चांगलंच तोंडसुख घेतलं. शिवसेना- भाजपाची 20 वर्षांची सत्ता तुटली. मुंबई महापालिकेचे बजेट एका छोट्या राज्यापेक्षा अधिक आहे. परंतु शिवसेना - भाजपाच्या या जोडगोळीने सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत फसवले आहे. तसंच शिवसेना भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याची टीका सुरजेवाला यांनी या वेळी केली.

भाजप - शिवसेना दाखवण्यासाठी युती तुटल्याचे ढोंग करत आहेत. सत्तेतल्या सुखसोईंचा आनंद, उपभोग मात्र ते वाटून घेतात यात तिळमात्र शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने पारदर्शकतेचा अर्थ आरोपी लोकांना क्लीनचीट देणे असा होतो. मुख्यमंत्री या प्रश्नाचं उत्तर देतील काय? त्यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे, जयकुमार रावल, संभाजी पाटील-निलंगेकर , रविंद्र चव्हाण, गिरीष महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव का केला. एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचे काय झाले. या सर्व प्रश्नांची उत्तरे फडणवीस देऊ शकतील का, असा सवाल या वेळी सुरजेवाला यांनी केला.

Loading Comments