विरोधी पक्षनेतेपदाची माळ काँग्रेसच्या गळयात

  BMC
  विरोधी पक्षनेतेपदाची माळ काँग्रेसच्या गळयात
  मुंबई  -  

  तब्बल एक महिना उलटत आला तरी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांची निवड अद्यापही झालेली नाही. मात्र, आता हा तिढा सुटला जाणार असून, विधी तज्ज्ञांनी दिलेल्या अभिप्रायनुसार दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष विरोधी पक्षनेतेपद स्वीकारत नसेल तर त्यानंतरच्या मोठी सदस्य संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येईल,असे म्हटले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे महापौर विरोधीपक्षनेत्याची माळ काँग्रेसच्या गळ्यात कधी घालतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

  महापालिका सभागृहात दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपाने ना सत्ताधाऱ्यांसह युती केली ना विरोधी पक्षात बसवण्याची भूमिका जाहीर केली. भाजपाने तटस्थ राहत पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्ष हा आवश्यक असल्यामुळे काँग्रेसचे गटनेते रविराजा यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड करून हे पद भाजपाला दिले जावे अशी मागणी हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. यावर विधी खात्याच्यावतीने अभिप्राय मागवण्यात आले होते. हे अभिप्राय महापौरांनी सभागृहात वाचून दाखवले

  विधी खात्याच्यावतीने दिलेल्या या अभिप्रायमध्ये संसदीय तरतुदीनुसार सभागृहात निर्णय घेण्याचे अधिकार हे महापौरांना आहेत. त्यामुळे ज्या पक्षांचे नगरसेवक अधिक आहे, अशा दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला विरोधी पक्षनेते दिले जावू शकते. परंतु त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यास तृतीय क्रमांकावरील पक्षाला निमंत्रित करता येवू शकतो,असे म्हटले आहे. मात्र, भाजपाने यावेळी आपण विरोधी पक्षनेतेपद स्वीकारत नसल्याचे जाहीर करत आपल्याला घटनेप्रमाणे ज्यांना बहाल करायचे त्यांना करावे. परंतु विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चोख कामगिरी न केल्यास त्यांना खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही,असा इशारा भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिला. त्यानंतर हा हरकतीचा मुद्दा महापौरांनी निकालात काढला. त्यामुळे भाजपाने हे पद नाकारल्यामुळे हे पद काँग्रेसला मिळणार आहे.

  शिवसेना अजूनही भाजपाच्याच ताब्यात

  विरोधी पक्षनेतेपदी विधी विभागाचे अभिप्राय वाचून दाखवल्यानंतर महापौरांनी, भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी हात वर करून बोलण्याची इच्छा प्रकट केली नसतानाही त्यांचे नाव पुकारून त्यांना बोलण्यास लावले. त्यामुळे त्यांनी या हरकतीच्या मुद्दयाआधारे भाजपाची भूमिका स्पष्ट केली. परंतु महापौरांनी, थेट भाजपाचीच घोषणा करून त्यांच्याकडून लेखी स्वरुपातील नकार मिळवणे आवश्यक होते. परंतु भाजपाच्या कब्जात असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी कोटक यांचे मत जाणून घेत त्यांना तांत्रिकदृष्टया हे पद देण्याची संधी गमावली. त्यामुळे थेट काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्यास महापौर अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.