Advertisement

राज्यघटना जाळणाऱ्यांविरोधात काँग्रेसची निदर्शनं

जंतर मंतरवर ९ ऑगस्ट रोजी काही समाजकंटकांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रती जाळल्या. एवढ्यावरच न थांबता राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेही मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. देशभरातून समाजकंटकांच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे.

राज्यघटना जाळणाऱ्यांविरोधात काँग्रेसची निदर्शनं
SHARES

 दिल्लीतील जंतर मंतरवर काही समाजकंटकांनी भारतीय राज्यघटनेची प्रत जाळत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दादर रेल्वे स्थानकाजवळ निदर्शनं करण्यात आली.


समाजकंटकांच्या कृत्याचा निषेध

जंतर मंतरवर ९ ऑगस्ट रोजी काही समाजकंटकांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रती जाळल्या. एवढ्यावरच न थांबता राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेही मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. देशभरातून समाजकंटकांच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. मंगळवारी मुंबईत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दादर स्थानकाजवळ निदर्शनं केली. यावेळी संविधान बचाव, देश बचाव, समाज कंटकांना अटक करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या अांदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.


आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोह आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा. तसंच ज्या पोलिसांच्या समोर हा प्रकार घडत होता आणि ते पोलिस निमूटपणे बघ्याची भूमिका घेत होते त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा काँग्रेस अशा समाजकंटकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
-  एकनाथ गायकवाड, माजी खासदार



हेही वाचा -

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' नेत्यांची हकालपट्टी!

६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा