Advertisement

फडणवीस सरकारने केली मुंबईकरांची फसवणूक- सचिन सावंत

तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती राजकारण करत मुंबईकरांची ५ वर्षे फसवणूक केली. ही फसवणूक मी कागदोपत्री सिद्ध करून दाखवेल, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

फडणवीस सरकारने केली मुंबईकरांची फसवणूक- सचिन सावंत
SHARES

तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती राजकारण करत मुंबईकरांची ५ वर्षे फसवणूक केली. ही फसवणूक मी कागदोपत्री सिद्ध करून दाखवेल, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित कांजूरमार्ग येथील जागेवरील केंद्र सरकारचा दावा खोडून काढण्यासाठी सचिन सावंत (sachin sawant) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर फसवणुकीचे आरोप केले. सचिन सावंत म्हणाले, कांजूरमार्ग येथील जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. म्हणूनच राज्य सरकारने मेट्रो ३ आणि ६ ची कारशेड कांजूरमार्गला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा आराखडा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आखण्यात आला होता. एवढंच नाही, तर एमएमआरसीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांनी त्यावेळी राज्य सरकारला पत्र पाठवून मेट्रो ३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा सर्वाधिक उपयुक्त असल्याचं म्हटलं होतं, असा दावा सचिन सावंत यांनी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच आता केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील जागेवर आपला दावा सांगितला आहे. यामागे हीन राजकारण आहे. कांजूरमार्गची जागा घेण्यासाठी ५ हजार २०० कोटी रुपये भरण्याचं कोर्टाने सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात. तसं काहीही नसताना हे पेसै कुणाला द्यायचे हे फडणवीस यांनी स्पष्ट करावं तसंच आरेमध्येच मेट्रो कारशेड का पाहिजे होतं? हे देखील त्यांनी सांगावं, त्यांनी सांगितलं नाही, तर याबाबतचे सर्व पुरावे सादर करणार असल्याचंही सचिन सावंत यांनी सांगितलं.

(congress spokesperson sachin sawant slams devendra fadnavis government over metro car shed kanjurmarg land)


हेही वाचा-

मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आदित्य ठाकरेंना आव्हानRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा