Advertisement

भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, काँग्रेसची खरमरीत टीका

भाजप ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.

भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, काँग्रेसची खरमरीत टीका
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून भाजप नेते सातत्याने मुंबई पोलिसांना लक्ष्य करताना दिसत आहेत. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठीच हा सर्व आरोप-प्रत्यारोपांचा खेळ भाजपने रंगवलेला आहे. भाजप ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक, असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांवर केली आहे. (congress spokesperson sachin sawant slams maharashtra bjp over sushant singh rajput suicide case)

भाजप नेत्यांवर टीका करताना सचिन सावंत म्हणतात की, केवळ बिहार निवडणुकीसाठी राजकारण करण्याकरीता बिहार पोलिसांचं गुणगान केलं जात आहे आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा महाराष्ट्रद्रोह उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलीस अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे क्वाॅरंटाईन करण्यात आलं, त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकार आता सीबीआयला देखील क्वाॅरंटाईन करणार का? सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकार झोपली आहे का? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले

बिहारच्या पोलिसांना मुंबईत क्वाॅरंटाईन करण्यात आल्यानंतर बिहार सरकारने याबाबत नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि या प्रकरणाताचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारने ही माहिती न्यायालयात दिली.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतचे वडील के.के सिंह यांनी बिहारमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आले होते. बिहार पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत बरीच माहिती मिळवली. त्यात सुशांतच्या बँकेचे डिटेल्स खूप महत्वाचे ठरले. त्या बँक डिटेल्सच्या आधारे सुशांतच्या खात्यातून रियाच्या बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहाराद्वारे रियावर पोलिसांचा संशय बळावला. रियाच्या चौकशीसाठी बिहार पोलीस तिच्या घरी देखील गेले. मात्र ती घरात नव्हती.

या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी बिहार सरकारने पोलीस अधिक्षकांना मुंबईत पाठवलं. पण ते मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वाॅरंटाईन करण्यात आलं आणि वादची ठिणगी पडली. या दरम्यान रियाने सुप्रीम कोर्टात याचिका करत या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा अशी याचिका केली होती.

 हेही वाचा - आता महाराष्ट्र सरकार सीबीआयलासुद्धा क्वारंटाईन करणार का? भाजपचा सवाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा