Advertisement

महिनाभर काँग्रेस प्रवक्त्यांची मुस्कटदाबी, वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होण्यास मनाई

लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर कॉंग्रेस पक्षानं कोणत्याही प्रवक्त्याला पुढील महिनाभर वृत्त वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

महिनाभर काँग्रेस प्रवक्त्यांची मुस्कटदाबी, वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होण्यास मनाई
SHARES

लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर कॉंग्रेस पक्षानं कोणत्याही प्रवक्त्याला पुढील महिनाभर वृत्त वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कॉग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांना याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. मात्र, या ट्विटबाबत काँग्रेसनं अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळं वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत कॉग्रेस प्रवक्ते सहभागी होणार का नाही याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.


राजीनाम्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. त्याशिवया ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, त्या राज्यांमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले. त्याचप्रमाणं, आपल्या राजीनाम्यावर ठाम राहत राहुल यांनी गांधी घराण्यातील पक्षाध्यक्ष नसावा असं मत माडंलं.


ज्येष्ठ नेत्यांबाबत नाराजी

त्याचप्रमाणं, राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या भेटीसाठी देखील नाकार दिला आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष चर्चेच्या कार्यक्रमांमध्ये अडचणीत येऊ शकतो. तसंच, यामुळं राहुल यांच्या राजीनाम्याच्या विषयाला वेगळं वळण लागू शकतं आणि याचा फटका काँग्रेसला बसू शकतो, त्यामुळं पक्षानं हा निर्णय घेतला असवा अशी चर्चा सध्या सुरू आहे.



हेही वाचा -

पायल तडवी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे

'आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण नाहीच' - सर्वोच्च न्यायालय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा