Advertisement

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- नारायण राणे

मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- नारायण राणे
SHARES

कोरोना प्रादुर्भावामुळे (coronavirus) राज्यात निर्माण झालेली स्थिती हाताळण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला सत्तेतून हटवत राज्यात राज्यात राष्ट्रपती राजवट (president's rule in maharashtra) लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (maharashtra governor bhagat singh koyshari) यांना केली आहे.   

क्षमता नाही

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना नारायण राणे (bjp mp narayan rane) म्हणाले की, महाराष्ट्रातील ठाकरे (thackeray government) सरकार कोरोनाचं संकट हाताळू शकत नाही, कारण त्यांच्यात ती क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी मी राज्यपालांकडे केली आहे.

हेही वाचा- ‘या’ कारणासाठी पवारांनी घेतली राज्यपालांची भेट 

रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्या

राज्यात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लोकांची उपासमार सुरू आहे. कुणाच्याही हाताला रोजगार नाही, गरिबांना अन्नधान्य मिळत नाही. परीक्षा रद्द होत आहेत. केवळ बंद, बंद आणि स्थगिती, स्थगिती यापलीकडे सरकार काहीच करताना दिसत नाही. राज्य कसं चालवावं, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली. 

अनागोंदी कारभार

आतापर्यंत राज्याला जे काही मिळालं ते केंद्राकडूनच. राज्याने काय दिलं? रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनबाबत जी भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे. यांचं धोरण काय? सरकारी अधिकार्‍यांना, पोलिसांना कसं हाताळावं, त्यांना सुरक्षित कसं ठेवावं, याचा काहीही अभ्यास नाही. सगळा अनागोंदी कारभार राज्यात सुरु आहे, असा आरोपही नारायण राणे यांनी सरकारवर केला.

हेही वाचा- राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा