Advertisement

‘सीएसआर’बाबत काय म्हणाले फडणवीस?

एसडीआरएफ (sdrf) खात्यात सीएसआर निधी स्वीकारता येतो, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी दिली आहे.

‘सीएसआर’बाबत काय म्हणाले फडणवीस?
SHARES

सीएसआर निधी (CSR fund) हा मुख्यमंत्री सहायता निधीत (cm relief fund) नाही, तर केवळ पंतप्रधान निधीतच घेता येतो, असा एक आरोप सध्या केंद्र सरकारवर करण्यात येत आहे. त्यावर खुलासा करताना २०१३ मधील कायद्यानुसार एसडीआरएफ (sdrf) खात्यात सीएसआर निधी स्वीकारता येतो, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी दिली आहे.

उपखाती उघडता येतात

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पीएम रिलिफ फंड (pm relief fund) असताना पीएम केअर फंडची (pm cares fund) गरज काय ? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचं उत्तर असं आहे की एखाद्या विशिष्ट कारणासाठी उपखातं तयार करता येतं. जसं महाराष्ट्रात सीएम रिलिफ फंडाची (maharashtra cm relief fund) ९ उपखाती आहेत. पूर, भूकंप अशा विशिष्ट हेतूसाठी अशी उपखाती उघडता येतात. 

हेही वाचा - केशरी रेशन कार्डधारकांना एप्रिलचं रेशन का नाही? फडणवीसांचा सरकारला सवाल

केंद्राचा कायदा

तसंच सीएसआर निधी हा केवळ पंतप्रधान निधीतच घेता येतो आणि तो मुख्यमंत्री सहायता निधीत घेता येत नाही, या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं, हा कायदा तत्कालीन संपुआ सरकारने (upa government) २०१३ मध्ये केला होता. हा कायदा करताना त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. सीएसआर निधी केवळ मुख्यमंत्री सहायता निधीत गेल्यास ज्या राज्यात अधिक कंपन्या आहेत किंवा जी राज्यं मोठी आहेत, अशा राज्यांना त्याचा लाभ होईल आणि तर गरज असलेली इतर राज्ये उपेक्षित राहतील, त्यामुळे अशी तरतूद करण्यात येत असल्याचा स्पष्टीकरण तत्कालीन सरकारने दिलं होतं.

निधी मिळतो

राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर सीएसआर निधी मुख्यमंत्री सहायता निधीत मिळावा, अशी मागणी करणारं पत्र केंद्र सरकारला लिहिलं होतं. परंतु याबाबत स्पष्ट कायदा असल्याने, तसं करता येणार नाही, असं केंद्राने आपल्याला कळवलं होतं. परंतु एसडीआरएफ (sdrf account) खात्यात मात्र सीएसआर निधी (CSR fund) स्वीकारता येतो. केंद्र सरकारने २३ मार्च आणि १० एप्रिल अशा दोनवेळा यासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले आहेत. सीएसआर निधी मिळतच नाही, असं नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला. 

हेही वाचा - तर, बीएमसी, एमएमआरडीएचे पैसे वापरा, फडणवीस यांचा सरकारला सल्ला

राजकारण नको

एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) आपल्याला केंद्राकडून मदत मिळत असल्याचं सांगत असताना, काही नेते मात्र केंद्राकडून मदत मिळत नसल्याचे सांगून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कठीण प्रसंगी राजकारण करणं योग्य नाही,  असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा