Advertisement

परप्रांतीयांसाठी विशेष रेल्वे सोडणं धोक्याचं, असं का म्हणाले नितीन गडकरी?

परप्रांतीयांना घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे (special trains) सोडण्याचा निर्णय धोक्याचा ठरू शकतो असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (transport minister nitin gadkari) यांनी केलं आहे.

परप्रांतीयांसाठी विशेष रेल्वे सोडणं धोक्याचं, असं का म्हणाले नितीन गडकरी?
SHARES

महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना (Migrant workers) घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहेत. परंतु परप्रांतीयांना घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे (special trains) सोडण्याचा निर्णय धोक्याचा ठरू शकतो असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (transport minister nitin gadkari) यांनी केलं आहे. 

राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात ठिकठिकाणी परप्रांतीय मजूर अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) करत आहेत. परंतु हे धोक्याचं ठरू शकतं. हे सर्व मजूर महाराष्ट्रात काम करण्यासाठी आले आहेत. मात्र लाॅकडाऊनमुळे (lockdown) इथले सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने त्यांच्या हाताला काम उरलेलं नाही. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती इतर राज्यांमध्येही आहे. परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठवल्यानंतर तिथंही त्यांना काम नसेल. उलट तिथं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हाच यावर उपाय असून सरकारने टप्प्याटप्प्याने तसा निर्णय घेतला पाहिजे.

हेही वाचा - लाॅकडाऊन संपताच परप्रांतीयांसाठी विशेष ट्रेन सोडा, अजित पवारांचं रेल्वेमंत्र्यांना पत्र

कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या किंवा कोरोनाबाधित नसलेल्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात अटी-शर्थींच्या आधारे काही उद्योग सुरू करता येतील. तशी परवानगी देखील देण्यात आली आहे. परंतु मुंबई-पुण्यात उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगली परिस्थिती नाही, हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं बरोबर असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

कोरोनामुळे मुंबई-पुणे या औद्योगिक पट्यातील स्थिती संवेदनशील बनली आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला यापूर्वीच कल्पना दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असल्याचंही गडकरी म्हणाले.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवत लाॅकडाऊनचा कालावधी संपताच परप्रांतीयांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्याची विनंती केली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अशा रेल्वेचं आधीच नियोजन करण्याची सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा