राज्यात मोठं आर्थिक संकट, ताबडतोब २५ हजार कोटींचं पॅकेज द्या- अजित पवार

केंद्र सरकारने आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राला (bailout packege for maharashtra) त्वरीत २५ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.

राज्यात मोठं आर्थिक संकट, ताबडतोब २५ हजार कोटींचं पॅकेज द्या- अजित पवार
SHARES

केंद्र सरकारनं देशात ३ आठवड्यांचं लॉकडाऊन (lockdown) जाहीर केल्यामुळे उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र ठप्प आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडते परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा उत्पन्न जवळपास थांबल्याने राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राला (bailout packege for maharashtra) त्वरीत २५ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, अशी विनंती करणारं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (fainance minister ajit pawar) यांनी केंद्र सरकारला पाठवलंआहे. 

हेही वाचा- आर्थिक संकटाला तोंड देण्यास तयार रहा, शरद पवार यांचा इशारा

प्रभारींना विनंती

‘कोरोना’च्या (coronavirus) संकटाचा मुकाबला करण्यासाठी  २५ हजार कोटींचं विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करावं, यासंबंधीचं पत्र अर्थमंत्री निर्माला सीतारामण, राज्याचे केंद्रातले प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना पाठवल्याची माहिती अजित पवार यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.  

थकबाकी त्वरीत द्यावी

दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं देशात ३ आठवड्यांचं लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र ठप्प आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडते परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा उत्पन्न जवळपास थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यातच केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे १६८७ कोटी तसंच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे १४ हजार ९६७ कोटी रुपये अशी एकूण १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही थकबाकी ३१ मार्चपर्यंत राज्याला मिळावी, अशी विनंती देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

हेही वाचा- Coronavirus Update: अखेर राज्य सरकारने लावली परप्रांतीयांच्या खाण्यापिण्याची सोय!

संबंधित विषय