Advertisement

वाधवान बंधूला सीबीआयच्या ताब्यात देणार- अनिल देशमुख

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान आणि त्याचा बंधू धीरज वाधवान (wadhawan brothers) यांना सीबीआय (CBI) तसंच अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) ताब्यात देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

वाधवान बंधूला सीबीआयच्या ताब्यात देणार- अनिल देशमुख
SHARES

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान आणि त्याचा बंधू धीरज वाधवान (wadhawan brothers) यांना सीबीआय (CBI) तसंच अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) ताब्यात देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. वाधवान कुटुंबातील २३ जणांना क्वारंटाईनमध्ये (quarantine) ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या क्वारंटाईनची वेळ बुधवार २२ एप्रिल रोजी संपत असल्याने त्यांना ताब्यात घेण्याविषयी पोलिसांनी ईडी तसंच सीबीआयला पत्र लिहून कळवलं आहे.

जामिनावर बाहेर

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (DHFL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना २७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मयत गँगस्टर इक्बाल मिर्चीशी राहिलेल्या कनेक्शनवरून ईडीने ही कारवाई केली होती. मनी लॉन्डरिंग कायद्याखाली वाधवान यांना अटक झाली होती. त्यानंतर मुंबईतील पीएमएलए कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी वाधवान यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.  

हेही वाचा - कपिल वाधवानला आणखी एक झटका, लाँकडाऊन तोडल्या प्रकरणी हायकोर्टाची नोटीस

विलगीकरण संपलं

कोरोनाचा (coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊन सुरू असताना वाधवा बंधू आणि त्याच्या कुटुंबाने गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (special principal secretory amithabh gupta) या विशेष परवानगीचं पत्र मिळवलं आणि या पत्राच्या साहाय्याने सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आलेल्या असतानाही वाधवान बंधू, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि नोकरवर्ग यांनी आधी मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्‍वर असा बेकायदेशीर प्रवास केला. परंतु महाबळेश्वर दरम्यानच्या पोलिसांच्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आल्याने २३ जणांविरुद्ध महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय त्यांच्या ५ आलिशान कारही जप्त करण्यात आल्या. त्यानंतर वाधवान कुटुंबातील २३ जणांना एका हायस्कूलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं.

ताब्यात घ्या

वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ २२ एप्रिल रोजी संपत असल्याने पोलीस खात्यातर्फे ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवण्यात आलं आहे. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी यावेळी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा