Advertisement

मध्य प्रदेशातील मजुरांच्या मदतीला काँग्रेस आली धावून, प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलणार

मध्य प्रदेशातील मजुरांच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्षाकडून उचलण्यात येईल, अशी घाेषणा काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांनी केली आहे.

मध्य प्रदेशातील मजुरांच्या मदतीला काँग्रेस आली धावून, प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलणार
SHARES

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला पाठवण्यात आलेल्या परप्रांतीयांच्या तिकीटाचे पैसे कोण देणार यावरून रंगलेल्या वादाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याकडे पाहता मध्य प्रदेशातील मजुरांच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्षाकडून उचलण्यात येईल, अशी घाेषणा काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातून जाण्याची व्यवस्था

कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत देशव्यापी लाॅकडाऊन वाढवला आहे. लाॅकडाऊन वाढवतानाच गृह विभागाने पत्रक काढत परप्रांतीयांना आपापल्या घरी परतण्यासाठी राज्याबाहेर प्रवास करण्याची मुभाही दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये रवाना करण्यास सुरूवात केली आहे. परंतु या प्रवासाच्या तिकीटाच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

हेही वाचा - चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष

स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात सोडण्यासाठी केंद्र सरकार एकूण खर्चाच्या ८५ टक्के; तर राज्य सरकार १५ टक्के भार उचलेल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. एवढंच नाही, तर या प्रवासादरम्यान मजुरांची जेवणाचीसुद्धा व्यवस्था केल्याचा केंद्राचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र या मजुरांकडून तिकीटांच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेण्यात आल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. मजुरांकडून केंद्र सरकारने तिकीटाचे पैसे घेऊ नये, अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या विनंतीलाही हरताळ फासण्यात आल्याचं यावरून दिसत आहे.

काँग्रेसचा पुढाकार  

त्यामुळे काँग्रेसने या मजुरांच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलण्याचं ठरवलं आहे. यासंदर्भात मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, लाॅकडाऊनमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलेले मध्य प्रदेशातील लाखो मजूर आपल्या राज्यात, जिल्ह्यात, गावी येण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचेही प्रचंड हाल होत आहेत. अशा स्थितीतही केंद्र किंवा राज्य सरकारकडून त्यांना प्रवासासाठी साधन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाहीय, ही अतिशय खेदाची बाब आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या सर्व मजुरांच्या प्रवासाचा मग तो ट्रेन असो किंवा बस देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मध्य प्रदेशातील नागरिक आपापल्या गावी परतू शकतील.  

मध्य प्रदेश काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या मजुरांच्या तिकीटांचा घोळ संपतो की राहतो, याकडे मजुरांचं लक्ष लागलं आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा