Advertisement

म्हणून शरद पवार गेले मातोश्रीवर, त्यांनीच केला खुलासा…

महाविकास आघाडी सरकारला पुढील ५ वर्षे कुठलाही धोका नाही. हे सरकार स्थिर आहे, असं शरद पवार म्हणाले.

म्हणून शरद पवार गेले मातोश्रीवर, त्यांनीच केला खुलासा…
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांना भेटण्यासाठी मंगळवार २६ मे २०२० रोजी वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी (matoshree) गेल्यामुळे राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi government) अस्थिर झालं आहे का? राज्यात राष्ट्रवादी राजवट येणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यावर खुद्द पवार यांनी भाष्य करत सर्व शंका-कुशंका फेटाळून लावल्या आहेत.

सरकार स्थिर

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार (ncp chief sharad pawar) म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असून राज्यपालांचं देखील हेच मत आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारला पुढील ५ वर्षे कुठलाही धोका नाही. हे सरकार स्थिर आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- नारायण राणे

कोरोनासंदर्भात चर्चा

उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. तिन्ही पक्षांची भूमिका याबाबतीत सारखीच आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी माझी सातत्याने चर्चा होत असते. मागील काही दिवसांत आम्ही अनेकदा दादरमध्ये भेटलो. कालच मी उद्धव ठाकरे यांना 'मातोश्री'वर येतो असं सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांची संख्या, आरोग्य सुविधा याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबद्दल चर्चा केली. या चर्चेत राजकाणाचा विषय नव्हता.

राज्यपालांचंही मत

तसंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मला दोन वेळा चहाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं काल त्यांना भेटायला गेलो. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याचं राज्यपालांचं देखील मत आहे, असं राजभवनवरील चहापानाच्या विषयावर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा